विशाल परब - युवराज लखमराजेंनी घेतलं दत्त दर्शन

Edited by: विनायक गांवस
Published on: December 05, 2025 12:12 PM
views 184  views

सावंतवाडी : दत्तजयंतीच्या निमित्ताने भाजपचे युवा नेते विशाल परब व युवराज लखमराजे भोंसले यांनी शहरातील देवस्थानांना भेट देत दर्शन घेतले. यापैकी वेदिका परब उपस्थित होत्या‌.

शहरात ठिकठिकाणी जात विशाल परब यांनी सपत्नीक दत्तदर्शन घेतले. मंदिरातील टाळ-मृदुंगाचा गजर आणि 'दिगंबरा'चा जयघोष ऐकून मन प्रसन्न झाले, ईश्वराकडे एकच मागणं आहे सर्वांच्या आयुष्यात असाच आनंद आणि समाधान कायम राहो अशी प्रार्थना त्यांनी केली. यावेळी दत्त पालखीचे दर्शनही त्यांनी घेतले. तदनंतर एकमुखी दत्त मंदिरात जात विधिवत पूजा केली आणि श्री दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली. मंदिरांमधील टाळ-मृदुंगाचा गजर आणि 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा'चा जयघोष यामुळे वातावरण अत्यंत मंगलमय झाले होते.

यावेळी युवराज लखमराजे भोंसले, माजी नगरसेवक उदय नाईक, समृद्धी विर्नोडकर, केतन आजगावकर, हितेन नाईक, धिरेंद्र म्हापसेकर, साक्षी गवस आदींसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते