कुडाळमध्ये २१ फेब्रुवारीला भव्य रोजगार मेळावा

व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल यांनी केले आहे आयोजन
Edited by: भरत केसरकर
Published on: February 16, 2023 17:24 PM
views 1267  views

सावंतवाडीनंतर कुडाळमध्ये मेळावा ,अनेक तरुणांना मिळणार रोजगार

 कुडाळ:  व्हरेनियम क्लाउड एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल या कंपनीच्या वतीने येत्या २१ फेब्रुवारी २०२३ रोजी कुडाळ एमआयडीसी मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत हा रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात सुद्धा  नामवंत कंपन्या सहभागी होणार असून त्याद्वारे तरुणांना नक्कीच त्यांच्या पात्रतेप्रमाणे रोजगार उपलब्ध होणार आहेत. अलीकडेच सावंतवाडी येथे झालेल्या रोजगार मेळाव्याला सुद्धा फार चांगला प्रतिसाद लाभला होता आणि त्यात अनेक तरुणांना रोजगार मिळाला होता. व्हेरेनिंअम या कंपनीने तर तत्काळ 20 जणांना नोकरीची लेटर दिली होती.

    तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या व्हरेनियम क्लाउड लिमिटेड या कंपनीने कोकणात सावंतवाडी येथे अलीकडंच  पहिले बिपिओ  सुरू केले आहे. यामार्फत स्थानिक २० जणांना रोजगार सुद्धा  प्राप्त झाला. 

   मुंबई युनिव्हर्सिटीचे सब सेंटर सावंतवाडीत सुरू केले असून व्हरेनियम क्लाउड लिमिटेड आणि एडमिशन यांनी इफ्रास्ट्रक्चर आणि टेक्निकल सुविधा पुरविली आहे. त्याच बरोबर व्हारेनिअम क्लाउड लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून कोकणात रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

     कुडाळ येथे होणाऱ्या मेळाव्यात येणाऱ्या कंपन्या या मुंबई पुणे गोवा येथीलही असतील त्यामुळे ज्यांना जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी जॉब दिले जानार आहेत. तसेच आपल्या शैक्षणिक पात्रता व आलेल्या कंपन्या यांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांना  त्या त्या ठिकाणी अर्ज सादर करता येणार आहेत, 

       कंपनीच्या वतीने  रोजगार मेळाव्या बरोबरच आणखी सुद्धा इतर प्रकल्प कोकणात येणार आहेत. आणि या सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून  येथील तरुणांच्या हाताला काम मिळेल अशी ग्वाही कंपनीचे संचालक  हर्षवर्धन साबळे यांनी दिली आहे. 

     सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती म्हणजे कुडाळ येथे कंपनीचे डाटा सेंटर उभारले जात आहे.या डाटा सेंटरचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही अशा प्रकारची डाटा सेंटर होणार आहेत.  या सर्वांच्या माध्यमातून शिक्षण विषयक सुविधा कंपनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थांना प्रदान करणार आहे. .

   व्हरेनियम क्लाउड लिमिटेड कंपनी  मोडेल करिअरच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगगाराच्या संधी येथील स्थानिक युवक - युवतींना देण्यात आल्या आहेत. तर कंपनीकडून सावंतवाडी तालुक्यातील १२ जणांना हॉटेल इंडस्ट्रीज मध्ये गोवा आणि बेंगलोर येथे रोजगार प्राप्त झाला आहे.  तसेच ५ जानेवारी २०२३ रोजी व्हरेनियम क्लाउड लिमिटेड आणि एडमिशन आयोजित  रोजगार मेळाव्यात अनेक कंपन्या  दाखल झाल्या होत्या. त्यातून येथील स्थानिकांना १० ते २५ हजार वेतन असलेले रोजगार मिळाले आहेत.

   सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या कुडाळ येथे उभारण्यात आलेल्या  हायड्रा हे डाटा सेंटरचे उद्घाटन येत्या दोन दिवसात होणार आहे.


 *भारतातील पहिले कंटेंनर डाटा  सेंटर* 


भारतातील महत्वाचे सेंटर ठरणार आहे. . याद्वारे स्थानिकांना तसेच कोकणातील नागरिकांना रोजगार प्राप्त होईल. तसेच २७ डिसेंबर २०२२ रोजी गोवा - पणजी येथे सुरू झालेल्या डाटा सेंटर मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार मिळाला  आहे. कुडाळ मद्ये उभारण्यात आलेले हे डाटा सेंटर भारतातील पहिले कंटेंनर डाटा सेंटर असल्याची माहिती कंपनीक्या वतीने देण्यात आली आहे


*रोजगार मेळावा ठरणार लक्षवेधी*


दरम्यान येत्या २१ फेब्रुवारी २०२३ रोजी कुडाळ एमआयडीसी मध्ये व्हरेनियम क्लाउड एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत हा रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात सुद्धा नवमांत कंपन्या सहभागी होणार असून त्याद्वारे तरुणांना नक्कीच त्यांच्या पात्रतेप्रमाणे रोजगार उपलब्ध होणार आहेत. 

  कोकणातील तरुणांसाठी येथील  महिलांसाठी काही उपक्रम राबवावेत या उद्देशानेच व्हेरेनियम क्लाऊड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी काम करत आहे पुढच्या काळात विविध प्रकल्प या कंपनीच्या माध्यमातून आपण कोकणात राबविण्यात येणार आहेत. 

   गेल्या काही वर्षात ऍडमिशन सेंटरने सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून विविध प्रकल्प राबवले आहेत यात कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान घेतलेले नाही . कंपनी स्वतःच्या खर्चातून हे सगळे उपक्रम राबवत आहे.  मुंबई विद्यापीठाला सुद्धा मोफत जागा उपलब्ध करून दिलेली आहे.  हे करत असताना कोणत्याही प्रकारच सरकारी अनुदाना न घेता ऍडमिशन सेंटर हे प्रकल्प राबवत आहे.  अशाच प्रकारचे प्रकल्प भविष्यातही राबविणायत येणार आहे. कोणत्याही प्रकारची सरकारी अनुदान घेणं हा कंपनीचा उद्देश नाही तर इथल्या तरुणांना काम देणे या एकमेव उद्देशाने कंपनी काम करत असल्याने सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे अस  नम्र आवाहन कंपनीचे संचालक हर्षवर्धन साबळे  यांनी केल आहे.