LIVE UPDATES

गावागावात उद्योजक घडवणार : रवींद्र माणगावे

कोकणसाद लाईव्हच्या प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 18, 2026 15:29 PM
views 31  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : 'गाव तिथे उद्योजक' अभियानाच्या शुभारंभासाठी तळकोकणात आलेले महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स , इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष (MACCIA) मा. रवींद्र माणगावे यांनी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकणसाद लाईव्ह आणि दैनिक कोकणसाद्च्या सावंतवाडी येथील प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

 याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, संचालक ॲड. नकुल पार्सेकर, कोकणसादचे आयटी हेड विद्येश धुरी, व्हिडिओ एडिटर मयुरेश राऊळ आधी उपस्थित होते. दरम्यान , झाराप येथील आयोजित गाव तिथे उद्योजक अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स , इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष (MACCIA)  रवींद्र माणगावे यांची कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी कोकणातील रोजगार , उद्योजकता या मुद्द्यांवर सडेतोड मुलाखत घेतली . 

यावेळी , ग्रामीण आणि शहर यांच्यातील दरी अजूनही कायम असून अशावेळी गावातील नागरिक शहराकडे धाव घेत असताना गावं दिवसेंदिवस ओस पडत आहेत .त्यामुळे गावं समृद्ध होऊन गावागावात आर्थिक ताकद आली पाहिजे आणि हिच ताकद देऊन गावागावात उद्योजक घडवण्याचे काम 'गाव तिथे उद्योजक' या अभियानातून महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स , इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर करणार  असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष मा. रवींद्र माणगावे यांनी केले.ते पुढे म्हणाले ,कोकणाला निसर्गाची देणगी लाभली असून जगातील पर्यटनपूरक मॉडेल जर याठिकाणी आणले तर पर्यटन व्यवसायाच्या संधीला वाव आहे. त्याबरोबरच हॉस्पिटल टुरिझम संकल्पना अंमलात आल्यास पर्यटनासोबतच आरोग्य क्षेत्रातही रोजगार उपलब्ध होईल असे मत माणगावे यांनी व्यक्त केले.