निगुडेत भरधाव डंपरने घेतला बकरीचा बळी

प्रशासन माणसाचा जीव जाण्याची वाट बघतंय..?
Edited by:
Published on: October 28, 2023 16:59 PM
views 233  views

सावंतवाडी : निगुडे सोनुर्ली महामार्गावर सोनुर्ली येथील दगड खाणींवरून अवैधरिता खनिज वाहतूक निगुडे गावातून दिवसाढवळ्या ३० ते ४०  डंपर  केली जाते. आणि हे डंपर एवढ्या भरधाव वेगाने धावतात की समोर कोण आहे हे त्यांना समजत नाही. काल सकाळी ०९:३०  दरम्यान सोनुर्ली येथून खनिज वाहतूक करणारा डंपर ने निगुडे गावातील  शेतकरी पांडुरंग बाळा गावडे हे रोजच्या प्रमाणे आपल्या बकऱ्या सकाळी शेतात नेत असताना संतोष दिगंबर राणे यांच्या घराशेजारी एका डंपरने बकरीला उडवले.

संबंधित शेतकऱ्याचे  १५,०००/ रुपयांचे नुकसान झाले. यासंदर्भात निगुडे पोलीस पाटील सुचिता मयेकर, ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, व महेश गावडे यांनी पंचयादी केली. मे महिन्यात एक कोटी रुपये खर्च करून अनेक वेळा उपोषण करून सदर रस्ता नवीन केला. परंतु या अवैध वाहतुकीमुळे सदर रस्त्यावरून  दुचाकी ने वाहतूक करणे अवघड झाले आहे.

शाळेतील मुलं या रस्त्यावरून चालत येजा करत असतात. लहान मुलांच्या शाळेच्या बसेस याचं रस्त्यावरून जातात. परंतु गेले सहा सात महिने यासंदर्भात या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होते. रस्ता अरुंद असल्यामुळे अनेक लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो. उपप्रादेशिक परिवहन, महसूल विभाग आणि जिल्हा खनिकर्म यांच्या आशीर्वादाने सदर वाहतूक होत असल्याचा  ग्रामस्थांचं म्हणणं आहे आज या ठिकाणी एका पाळीव प्राण्याचा बळी गेला भविष्यात या ठिकाणी जर जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील यासंदर्भात योग्य ते दखल घेऊन ज्या खाणींवरून ही वाहतूक होते त्या खाणींचे परवाने कायमस्वरूपी रद्द करा  अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशाराही निगुडे ग्रामस्थांनी दिला आहे.

पर्यायी मार्ग सदर कंपनीने दिला असताना काही डंपर मालक या रस्त्याने दिवस रात्र वाहतूक करतात आणि कोट्यावधीचा महसूल बुडवला जातो तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सन २०२२ साली  ग्रामस्थांनी उपोषण केले असता ग्रामस्थांना या रस्त्यावरून खनिज वाहतूक झाल्यास कंपनीचा परवाना रद्द करू असे लेखी पत्र  तत्कालीन सरपंच समीर गावडे व ग्रामस्थ यांना दिला होता.  यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई न केल्यास संपूर्ण गाव रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.