आव्हानांना तोंड देणारी पिढी तयार होईल : राहुल रेखावर

Edited by: विनायक गावस
Published on: February 10, 2024 08:09 AM
views 109  views

सावंतवाडी : ५१ व राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यांसह माजगाव धरण व सावंतवाडी नळपाणी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे.

याप्रसंगी संचालक राहुल रेखावर यांनी आपलं मत व्यक्त केले. आजचा क्षण आनंदाचा आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी हुशार विद्यार्थांना कौशल्य दाखविण्याची संधी दिली याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. असे कार्यक्रम विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण करून देतात. त्यातूनच नवे वैज्ञानिक देशाला मिळतील, आव्हानांना तोंड देणारी पिढी तयार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.