
कणकवली : तालुक्यातील फोंडा इथ जुगाराचा दरबार सुरु असल्याची माहिती कोकणसाद LIVE ला गोपनीय खबऱ्याकडून मिळाली आहे. हा जुगार अड्डा फोंडा येथील कुर्ली वसाहत असलेल्या आलिशान अश्या रंगमंचावर रात्री १० वाजण्याच्या सुरु होतो अशी देखील माहिती हाती लागली आहे. याबाबत कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस मूग गिळून गप्प आहेत. त्यामूळे आता याबाबत नवनियुक्त पोलीस अधिक्षक अग्रवाल कोणती अँक्शन घेतात याची उत्सुकता आहे.