LIVE UPDATES

सालईवाडा येथे पाच गवा रेड्यांचा कळप

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 09, 2026 22:02 PM
views 31  views

सावंतवाडी : येथील सालईवाडा भागातील बीएसएनएलचे मुख्य कार्यालय आणि उपवनसंरक्षक यांच्या निवासस्थाना जवळ असलेल्या श्री. नाईक यांच्या घराशेजारील कंपाऊंडमध्ये पाच गवा रेड्यांचा कळप शिरल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. भरवस्तीत पाच गवा रेड्यांचा कळप थेट घरांच्या कुंपणाजवळ आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत स्थानिकांनी वनविभागाला तात्काळ माहिती दिली असून वनविभागाचे पथक या गव्यांना पुन्हा जंगलाच्या दिशेने हाकलण्यासाठी कोणती पावले उचलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहराच्या नागरी वस्तीत गव्यांचा वावर वाढल्याने वनविभागाने रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.