''इनरव्हीलन महोत्सवा''त मनोरंजनाची मेजवानी

शिक्षणमंत्री दीपक केसरकर रविवारी राहणार उपस्थित ; 'इनरव्हील क्वीन' खास आकर्षण !
Edited by: विनायक गांवस
Published on: December 24, 2022 19:25 PM
views 232  views

सावंतवाडी : सावंतवाडीत इनरव्हील महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मनोरंजनाच्या मेजवानीचा आस्वाद रसिकांनी घेतला‌. इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून हा 'इनरव्हील महोत्सव' आयोजित करण्यात आला असून दुसऱ्या दिवशीच्या डॉ. सायली प्रभू यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. रविवार २५ डिसेंबरला ह्या महोत्सवाचा समारोप होणार असून यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. समारोप प्रसंगी होणारी इनरव्हील क्वीन स्पर्धा खास आकर्षण ठरणार आहे.


 मोती तलाव काठी जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान सावंतवाडी येथे हा महोत्सव होत आहे. कोरोना काळानंतर प्रथमच अशा प्रकारचा महोत्सव आयोजित करण्यात आला असून याला सावंतवाडीकरांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या दिवशी डॉ. सायली प्रभू यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. यांनंतर सोलो रेकॉर्ड डान्स, ग्रुप डान्सनी उपस्थित रसिकांची मन जिंकली. मिडीया पार्टनर कोकणच नंबर वन महचॅनल कोकणसाद LIVE नं या महोत्सवाचे थेट लाईव्ह प्रक्षेपण करत जगभरात हा महोत्सव पोहोचवला. यावेळी इनरव्हीलच्या अध्यक्षा दर्शना रासम, सेक्रेटरी भारती देशमुख, आयएसओ देवता हावळ, एडिटर डॉ. सुमेधा नाईक- धुरी, डॉ. सुभदा करमरकर, डॉ. मीना जोशी, मृणालीनी कशाळीकर आदि उपस्थित होते. महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणारी ''इनरव्हील क्वीन'' ही स्पर्धा ३० ते ५० या वयोगटातील महिलांसाठी आयोजित केली आहे. रविवारी समारोपाच्या दिवशीच हे खास आकर्षण असणार आहे.