महामार्गावर भरधाव डंपरला आग !

Edited by: ब्युरो
Published on: April 03, 2024 11:09 AM
views 654  views

अलिबाग : मुंबई - पुणे जुन्या महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या डंपरला अचानकपणे आग लागून या आगीत डंपरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना चौक जवळ ३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान घडली आहे. तर आगीची भीषणता पाहून काही काळ या ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आली होती.

मुंबई - पुणे जुन्या महामार्गावरील चौक गावाजवळ ३ एप्रिलच्या सकाळच्या ११ वाजून २० मिनिटाच्या सुमारास धावत्या डंपरला मुंबई लेनवर आग लागली तर या आगीत डंपरची पुढील केबिन जळून खाक झाल्याने डंपरचे मोठे नुकसान झाले आहे. तर जवळपास ३० मिनिटे आग सुरू राहिल्यानंतर पाण्याच्या टँकर व फायर ब्रिगेडच्या सहाय्याने आग आटोक्‍यात आणण्‍यात आली.