दारुच्या नशेत कार चालकाची तिघांना धडक

Edited by: विनायक गावस
Published on: July 22, 2023 20:41 PM
views 326  views

सावंतवाडी : दारुच्या नशेत गाडी चालवत जाताना दोन दुचाकी व एका कारला धडक देत आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या गोवा येथील कारचालकाला आंबोली पोलिसांनी आंबोली दुरुक्षेत्रावरील पोलीस लाठीवर ताब्यात घेतले. करण विमलेश अहेर ( २६, मूळ गुजरातचा सध्या रा. गोवा ) असे त्याचे नाव आहे. मात्र तो आंबोलीच्या दिशेने का जात होता याबाबत त्याने कोणतीही माहिती दिलेली नाही. आंबोली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची तपासणी करण्यासाठी त्याला आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले आहे. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आंबोली दूरक्षेत्रावरील पोलीस लाठीवर स्वतः सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.