
देवगड : देवगड येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूलच्या नलावडे सभागृहात "एकच आप्पा" या कार्यसम्राट आमदार स्व.आप्पासाहेब गोगटे यांच्या जीवनपटलावर आधारित डाॅक्युमेंटरीचे प्रसारण झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या हस्ताक्षरतज्ञ डाॅ.भाई बांदकर यांच्याहस्ते हे प्रसारण झाले.
आप्पांचे सुपुत्र .प्रकाश गोगटे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेली एकच आप्पा ही डाॅक्युमेंटरी आप्पासाहेबांचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडून दाखवते, विविध मंडळींच्या मुलाखतीतून आप्पांच्या समाजकार्यावर प्रकाशझोत टाकतात. या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत शाळेचे मुख्याध्यापक संजय गोगटे यांनी डाॅक्युमेंटरीची असलेली गरज सांगितली.प्रमुख अतिथी डाॅ.भाई बांदकर आपल्या मनोगतात म्हणाले की आप्पासाहेबांची प्रत्येक कामातील सकारात्मकता सभोवतालच्या व्यक्तींना प्रेरित करणारी ठरायची. नाही हा शब्द आप्पांच्या शब्दकोशात नव्हता.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार ॲड.अजित गोगटे यांनी डाॅक्युमेंटरीतील आप्पांच्या कारकिर्दीतील काही घटना नमुद केल्या,आप्पांचे समाजकारण आजही आदर्श मानले जाते यावर भाष्य केले.या कार्यक्रमास डाॅ.भाई बांदकर, ॲड.अजित गोगटे, .प्रकाश गोगटे, .प्रसाद मोंडकर,.प्रविण जोग, .राजू काळे, ऍड. अभिषेक गोगटे, अरुण सोमण, सुधीर आचरेकर, निरंजन दीक्षित, आदी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन . सुनील जाधव यांनी केले.