
सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे माजी संचालक विकास सावंत यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर आज बुधवारी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात ठेवण्यात आले होते. यावेळी राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री आ. दीपक केसरकर त्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहीली.
विकास सावंत यांच्याशी आपले अत्यंत जिव्हाळ्याचे व कौटुंबिक संबंध होते. त्यांच्या निधनामुळे या जिल्ह्यातील शैक्षणिक क्रांतीचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत आ. दीपक केसरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण सावंत कुटुंबीयांच्या सदैव सोबत आहोत त्यांच्या कुटुंबीयांचे व आपले नेहमीच निकटचे संबंध राहिले आहेत त्यामुळे या दुःखद प्रसंगी त्यांना हे दुःख पचविण्याची परमेश्वराने ताकद देऊ अशा शब्दात त्यांनी उपस्थित सावंत कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, बंटी पुरोहित यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.