
दोडामार्ग : येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात A.D. श्रॉफ वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये सोनल गवस प्रथम, तर मानसी गवस हिने द्वितीय क्रमांक पटकावले. फोरम ऑफ फ्री एंटरप्राइजेस मुंबई,आणि लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालय दोडामार्ग,यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात येते.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषक 2500, द्वितीय 1500, तर तृतीय 1000, रुपये एवढे ठेवण्यात आले होते. ही स्पर्धा गेल्या 58 वर्षांपासून घेतली जात असून महाविद्यालयात दहा वर्षांपासून संप्पन्न होत आहे.दरवर्षी चालू विषयावर ही स्पर्धा घेण्यात येते.या वर्षी ही स्पर्धा पुढील विषयावर संपन्न झाली 1)डिजिटल पायाभूत सुविधा - भारताच्या एकत्रीकरणासाठीचे नवे तंत्र, 2)भारताने जागतिक क्रीडा क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. 3)आर्थिक सुधारणा आणि अपूर्ण कार्य सूची या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत म्हणाले की, विद्यार्थ्यांनी देश-वीदेशातील चालू घडामोडी बरोबरच आर्थिक, सामाजिक राजकीय स्थितीचा अभ्यास करावा,आपले ज्ञान समृद्ध करावे. यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी करून घेतला पाहिजे. महाविद्यालयामध्ये संपन्न झालेल्या या स्पर्धेचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी.डी. गाथाडे यांनी केले. सूत्रसंचालन सानिया गावंढळकर हिने केले तर उपस्थितांचे आभार भाग्यश्री गवस हिने मानले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कॉम्प्युटर विभागाच्या प्रमुख प्रा. सेफाली गवस व हॉटेल मॅनेजमेंटचे प्रा.पद्माकर शेटकर यांनी काम पाहिले.