शिवजयंती निमित्त कोलगावमध्ये वेशभूषा स्पर्धा

Edited by:
Published on: February 07, 2025 19:40 PM
views 237  views

सावंतवाडी : कोलगाव येथील माणुसकी प्रतिष्ठान आणि कोलगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त कोलगाव ग्रामपंचायत रंगमंचावर सायंकाळी ६:३० वाजता कोलगाव मर्यादित लहान मुलांच्या वेशभूषा स्पर्धेसह महिलांसाठी कोलगाव सौभाग्यवती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुकांनी विद्या राऊळ  ९४०५४९६७०१ आणि नितेश पेडणेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रामचंद्र राणे आणि संदेश राऊळ यांनी केले आहे. यावेळी माणुसकी प्रतिष्ठानतर्फे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.यावेळी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन माणुसकी प्रतिष्ठान आणि कोलगाव ग्रामस्थांनी केले आहे.