वर्षातून एकदातरी संपूर्ण आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे : डॉ. विद्याधर तायशेट्ये

कणकवलीत पत्रकार आरोग्य शिबीर
Edited by: उमेश बुचडे
Published on: November 01, 2023 13:09 PM
views 143  views

कणकवली : बदलेली जीवनशैली व धावपळीच्या युगात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. ताणतणावामुळे प्रत्येकाला मानसिक व शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यासाठी नियमित व्यायाम व समतोल आहार घेतला पाहिजे आणि वर्षातून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली पाहिजे. यापुढील काळात वर्षातून एकदा कणकवली तालुक्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी ही रोटरी क्लब कणकवली व संजीवनी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यामाने केली जाईल, अशी ग्वाही डॉ. विद्याधर तायशेटे यांनी दिली.

कणकवली तालुका पत्रकार समिती, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आणि संजीवनी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी मंगळवारी संजीवनी हॉस्पिटल येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी डॉ. तायशेटे बोलत होते. यावेळी रोटरी क्लब कणकवलीचे अध्यक्ष रवी परब, रोटरीयन उमा परब,  दादा कुडतरकर, प्रमोद लिमये, डॉ. वीरेंद्र नाचणे, कणकवली तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अजित सावंत, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर आदी उपस्थित होते.

रवी परब म्हणाले, रोटरी क्लब कणकवली गेली अनेक वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम स्तुत्य आहे. कणकवली तालुका पत्रकार समितीच्या सामाजिक उपक्रमांना रोटरी क्लब कणकवलीचे नेहमीच सहकार्य राहिले असून यापुढील काळातही ते राहील. प्रमोद लिमये म्हणाले, पत्रकारांनी आपल्या आरोग्याप्रति नेहमीच    सजग असले पहिजे ,काळजी घेतली पाहिजे. उमा परब व दादा कुडतकर यांनीही या आरोग्य विषयक उपक्रमाचे कौतूक करत रोटरी क्लब कणकवलीतर्फे दरवर्षी कोणते सामाजिक उपक्रम राबविले जातात, याची माहिती दिली.

प्रास्ताविकात अजित सावंत यांनी तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी  हाती घेतल्यानंतर आतापर्यंत कोणकोणते उपक्रम राबविले याची माहिती देत पत्रकारांची आरोग्य तपासणी आवश्यक असल्याची बाब स्पष्ट केली.  या शिबिराला सहकार्य केल्याबद्दल पत्रकार समितीतर्फे रोटरी क्लबचे अध्यक्ष रवी परब यांचा अजित सावंत , सचिव माणिक सावंत यांच्या हस्ते तसेच डॉ. विद्याधर तायशेटे यांचा उपाध्यक्ष  दिगंबर वालावलकर, अनिकेत उचले, खजिनदार योगेश गोडवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन तुषार हजारे यांनी तर आभार उत्तम सावंत यांनी मानले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार गणपत चव्हाण, जिल्हा पत्रकार समितीचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष राऊळ, चंद्रेशखर तांबट, तुषार सावंत, संजय पेटकर, लक्ष्मीकांत भावे , संतोष जोगळे, संजोग सावंत, नितीन सावंत, नितीन कदम, भास्कर रासम, आनंद तांबे, गुरुप्रसाद सावंत, मिलिंद डोंगरे, मिलिंद पारकर, राजेश सरकारे शशिकांत सातवसे, विराज गोसावी, प्रथमेश जाधव, दर्शन सावंत, सचिन राणे, रुपेश साळुंखे ,प्रदीप राणे आदी उपस्थित होते.