
दोडामार्ग : तळकट बांदा मार्गावर आज काजूचे झाड पडून दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती. तळकट येथील युवकांनी श्रमदानातून ते काजूचे झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दोन-तीन दिवस सुरू असलेल्या जोरदार वाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे पडून नुकसान झाले आहे काहींच्या घरावर झाडे पडून तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडून वाहतूक खोळंबली आहे. अशाच प्रकारे तळकट बांदा मार्गावर तळकट गोठणवाडी या ठिकाणी आज सकाळी काजूचे मोठे झाड पडून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. याची माहिती तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांना मिळतात, त्यांनी आपल्या मित्र परिवारासह हे झाड बाजूला केले व वाहतुक सुरळीत चालू राहण्यास मदत केली. आज सोमवारचा दिवस असल्यामुळे बांद्याचा आठवडा बाजारासाठी जाणाऱ्यांची मोठी दोन्ही बाजूने रांग लागली होती. हे झाड लगेच बाजूला केल्यामुळे तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले, त्यांचे सहकारी नारायण राऊळ, रजत देसाई, विकास सावंत, बंड्या राऊळ, साहिल नांगरे, प्रज्योत देसाई, चंद्रहास राऊळ, बाबल गवस, इत्यादींचे अभिनंदन होत आहे.