
वैभववाडी : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे भारतीय संविधानाचा अवमान करण्यात आला. हा प्रकार निषेधार्थ आहे. विटंबना करणाऱ्या समाजकटंकावर तातडीने राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन संघाच्यावतीने तहसीलदार सुर्यकांत पाटील यांना देण्यात आले.
संविधान अवमान आणि बौध्द जनतेला मारहाण या दोनही घटनेचा तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. संविधानाचा अवमान करण्याचा प्रकार महाराष्ट्रात घडणे ही देशहिताच्या दृष्टीने लाच्छनास्पद बाब आहे. अशा समाजकटंकावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई केली पाहीजे. याशिवाय नाहक बौध्द जनतेला मारहाण करणाऱ्या पोलीसांना तात्काळ निलबिंत करावे अशी मागणी देखील करण्यात आली.अशा आशयाचे निवेदन येथील तहसिलदारांना देण्यात आले.यावेळी शरद काबंळे,शिवाजी पवार,राजेंद्र पवार,सुरेश भोसले,गणेश भोसले,विजय यादव,प्रकाश यादव,तुकाराम पवार,हिरष काबंळे,दिक्षा काबंळे,मंगेश काबंळे आदी उपस्थित होते.
.