शाळेतील शिपायास धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Edited by: भरत केसरकर
Published on: August 14, 2023 16:43 PM
views 416  views

कुडाळ : माणगाव खोऱ्यातील वाडोस हायस्कूल येथील शिपायास शाळा चालू असताना शाळेत जाऊन धमकावल्याप्रकरणी वाडोसचे संदीप म्हाडगुत  व भाजपचे गोठोस सरपंच सुरज धाकोजी कदम यांच्यासह ९ जण व अनोळखी ५ महीलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने माणगाव खोऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी, कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निळेली येथील सिताराम जानू जानकर हे वाडोस येथील जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय येथे गेलीअनेक वर्षे शिपाई म्हणून कार्यरत आहेत. पाच सहा दिवसापूर्वी ११.३० च्या सुमारास वाडोस हायस्कूल सुरू असताना काही लोक शाळेत आले.ते थेट सीताराम जानकर यांच्याकडे गेला आणि निळेली गावात जाणारी एसटी गाडी बंद का केली? असा गाडी बंद केल्याचा आरोप करीत वाडोस गावातील संदीप महादेव म्हाडगुत व गोठोस गावचे भाजपचे सरपंच सुरज धाकोजी कदम यांच्यासोबत लक्ष्मण उर्फ संजय कृष्णा देसाई, प्रवीण उर्फ बाबल्या रविकांत म्हाडगुत, सूर्यकांत चिंतामणी धुमक  रा.निळेली, राजाराम मधुकर धुरी रा.मोरे, सुधाकर नारायण नाईक, आनंद बाबाजी सावंत यांच्यासह अजून अनोळखी पाच महिलांनी  या सर्वांनी मिळून अंगावर धावून येत मारहाण केली .तसेच जीवे मारण्याची धमकी सीताराम जानकर यांना दिली. तसेच संदीप म्हाडगुत याने सिताराम जानकर यांच्यावर खुर्ची मारण्यास उचलली.यासर्व प्रकाराबाबत सीताराम जानकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.