'त्या' ST चालकाविरुद्ध देवगड पोलीसांत गुन्हा दाखल

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 01, 2024 17:57 PM
views 798  views

देवगड : रस्त्याची काय अवस्था आहे. याकडे दुर्लक्ष करून वाहन चालवुन एसटी वरील नियंत्रण सुटल्याने एसटी बस रस्त्याच्या खाली दरीत जाऊन घराला ठोकर देऊन थांबली. या प्रकरणी देवगड आगारातील चालक बापू लक्ष्मण काळे यांचे विरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची फिर्याद एसटी बस वाहक राजेंद्र जाधव राहणार देवगड यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली आहे. सदरची घटना ३० डिसेंबर रोजी दुपारी २. वाजून २० मिनिटांच्या सुमारास पोयरे गोदापूर या मार्गावर घडली होती. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम हे करीत आहे.