दुचाकी चोरल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

देवगड स्टॅन्ड येथून २० ऑक्टोबरला गेली होती चोरीस
Edited by:
Published on: November 07, 2023 19:55 PM
views 267  views

देवगड : देवगड एसटी स्टँड सर्कल जवळ पार्किंग करून ठेवलेली दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी पाटथर सडा येथील रामा पाटोळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड एसटी स्टँड सर्कलकडे बाबुराव ओकळी यांनी आपली दुचाकी क्रमांक MH 07AA 6755 पार्किंग करून ठेवली होती.

ही दुचाकी 20 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री सव्वा आठच्या दरम्यान रामा पाटोळे (राहणार – पाटथर सडा मारुती मंदिर जवळ, मुळगाव – सांगली जत) याच्या विरोधात गाडीचे मालक बाबुराव बल्लाप्पा ओकळी (वय- 58 राहणार -सदाशिवनगर देवगड ) यांनी देवगड पोलिसात तक्रार दिली असून, देवगड पोलिसांनी रामा पातोळे यांच्या विरोधात भादवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विजय बिर्जे करत आहेत.