दारु पिऊन डंपर चालविणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Edited by:
Published on: February 27, 2025 14:28 PM
views 615  views

मंडणगड : दारुच्या नशेत  बेदरकारपरणे गाडी चालविलणारा नितेश पांडुरंग गोठल ( वय - ३६) राहणार शिपोळे यांचे विरोधात बाणकोट सागरी पोलीस स्थानकात २६ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस शिपाई कृष्णा चव्हाण यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील माहीतीनुसार यातील चालक हा आपल्या ताब्यातील डंपर केळशी फाट ते वेसवी दरम्यानचे अंतरात दारुच्या नशेत, बेदरकारपणे व निष्काळजीपणाने लोकांच्या जीवीतास धोका निर्माण होईल अशा पध्दतीने चालवित असलेला आढळून आला. त्यामुळे त्यांचे विरोधात भारतीय न्याय संहिता अधिनीयम २२३ चे कलम २८१, १२५, मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.