नामांकित कंपनीच्या बनावट पत्रांची विक्री केल्याप्रकरणी कणकवलीत एकावर गुन्हा

Edited by:
Published on: November 02, 2023 21:40 PM
views 99  views

कणकवली : जे एस डब्ल्यू या पत्राच्या नामांकित कंपनीचा लोगो वापरून बनावटी पत्रे विक्री केल्याप्रकरणी रोहित विष्णू शेटये (३१, रा, फोपेवाडी -करूळ) याच्यावर कॉपीराईट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद इ आय पी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीचे तपासिक अधिकारी सागर अशोक आबवणे (३९, रा. पुणे) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. रोहित शेटये याच्याकडे १ लाख ३६ हजार ६२० रुपये किमतीचे जेएसबीडब्ल्यू कंपनीचे बनावटी पत्रे मिळून आले.ही कारवाई इआयपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीच्या पथकाने व कणकवली पोलीस पथकाने बुधवारी दुपारी ३ ते ५ वा. च्या दरम्यान केली. इआयपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीला जे एस डब्ल्यू या कंपनीने बनावटी पत्रे बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार दिला आहे. त्या खाजगी कंपनीला कणकवलीत जेएसडब्ल्यू कंपनीचा लोगो वापरून बनावटी पत्रे विक्री होत असल्याची माहिती मिळाली. ते कणकवलीत दाखल होत त्या विक्रेत्यापर्यंत पोहोचण्यासाठी कणकवली पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर मुंबई -गोवा महामार्गावरील वागदे-गणेश मंदिर समोरील एका अपार्टमेंट मध्ये असलेल्या एका गाळ्यात इ आ यपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीच्या  व उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणी जे एस डब्ल्यू कंपनीचा लोगो वापरून बनवलेले बनावटी पत्रांचा विक्रीसाठी केलेला साठा मिळून आला.त्यामुळे कणकवली पोलिसांनी कॉपीराईट कायदा १९५७ नुसार रोहित शेट्ये याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.