कारची दुचाकीला धडक | पती पत्नी गंभीर

Edited by: विनायक गावस
Published on: August 24, 2023 19:38 PM
views 417  views

सावंतवाडी : कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील पती पत्नी गंभीर जखमी झाली. विजय होडावडेकर ( ५४) व विनीता होडावडेकर ( ५०, दोघेही रा. तुळस ) अशी त्यांची नावे असून त्यांना स्थानिकांनी मळगाव येथे असलेल्या श्री नरेंद्र महाराज संस्थान रुग्णवाहिकेतून  उपचारार्थ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, धडक दिलेला कारचालक कुडाळच्या दिशेने पळून गेला असून याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे.

यात विजय होडावडेकर यांच्या पायाला दुखापत झाली असून मुका मार लागला आहे. तर विनिता होडावडेकर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. धडक दिलेला कारचालक कुडाळच्या दिशेने पळून गेला अशी माहिती समोर येत आहे.