
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील गावराई गडकरवाड़ी येथील उध्दव ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शिंदे सेनेत प्रवेश करत ठाकरे सेनेला धक्का दिला.
कुडाळ तालुक्यातील गावराई गड़करवाडी येथील कार्यकर्ते गेली अनेक वर्षे ठाकरे सेनेसोबत होते. मात्र ठाकरे सेनेचे गेली १०वर्षे आमदार, खासदार असूनही त्यांनी या कार्यकर्त्यांच्या मागणीकड़े दुर्लक्ष केले. येथील पाणी सुविधा, रस्ते , गणेश घाट या सारख्या समस्या कायम भेडसावत आहेत. केवळ निवडणुकीत आपला वापर करून घेतला असा त्यांचा आरोप आहे. अखेर त्यांनी शुक्रवारी उध्दव ठाकरे सेनेशी फारकत घेत शिंदे सेनेत प्रवेश केला .सर्व कार्यकर्त्यांचे दत्ता सामंत यांनी स्वागत करत येथील विकासकामे आणि समस्या सोडविण्याची जबाबदारी आपली राहिल अशी ग्वाही यावेळी दिली.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, तसेच संजय पड़ते, राजन परब, विनायक राणे, परशुराम परब , प्रकाश पावसकर , स्वप्निल गावडे,शाखा प्रमुख किसन चिंदरकर आदि पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत गावराई गडकरवाड़ी येथे शुक्रवारी पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला . यावेळी शैलेश राऊत, गीतेश राऊत, सतीश राऊत, अरविंद राऊत, सुरेश राऊत, विष्णु राऊत, कृष्णा वाईरकर, सिद्देश राऊत, मोहन वाईरकर, यांच्यासह मोठ्या संखेने महिला व पुरुष कार्यकर्त्यानी शिंदे सेनेत प्रवेश केला. यामुळे गावराई गावात शिंदे सेनेची ताकत वाढली आहे.












