
सावंतवाडी : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मडुरा येथील मुर्तीकार गणेश मेस्त्री यांनी छत्रपतींची तब्बल अडीच फूट सुबक मूर्ती साकारली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस तसेच कागदाच्या लगद्यापासून ही मूर्ती घडवली आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील आडेली गावात असलेल्या एका मंडळाच्या माध्यमातून शिवजयंतीला या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.श्री मेस्त्री गेली चार ते पाच वर्षे मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करत आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक मूर्त्या बनविल्या आहेत. विशेष म्हणजे कागदी लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या त्यांच्या मुर्त्यांना ऑस्ट्रेलियासह विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अनेक कलाकार घडवण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी केलेली छत्रपतींची सुबक मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.