जामसंडे येथील वीस वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या.

दारूच्या नशेत कृत्य केल्याचा अंदाज
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 15, 2023 18:13 PM
views 141  views

देवगड : जामसंडे येथील श्रीपाद राजेंद्र मोरे (20) या युवकाने दारुच्या नशेत घरातील बेडरुम मधील सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

सदरची घटना मंगळवारी रात्री 8 वा. सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार श्रीपाद राजेंद्र मोरे हा आपल्या आई व बहिणी  समवेत जामसंडे येथे राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरात आई व बहीण असताना त्याने बेडरूम मध्ये जाऊन दरवाजाची कडी लावली व सिलिंग फॅनला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.  ही घटना खिडकीतून बहिणीने पाहिली असता दरवाजा उघडून त्यांनी दोरी कापली मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.  या घटनेची नोंद देवगड पोलीस स्टेशनला करण्यात आली असून अधिक पोलीस तपास पीएसआय जितेंद्र कांबळे करत आहेत.