वेंगुर्ले संजय गांधी निराधार योजनेच्या सभेत ३२ प्रकरणे मंजूर : अध्यक्ष संतोष गावडे

Edited by: दिपेश परब
Published on: July 26, 2023 19:27 PM
views 88  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुका संजय गांधी निराधार समितीची त्रैमासिक सभा नुकतीच तहसीलदार कार्यालय वेंगुर्ले येथे संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे यांच्या अध्यक्षतेखालील पार पडली. या बैठकीत संजय गांधी निराधार योजनची २४ व श्रावणबाळ या योजनेची ८ अशी एकूण ३२ प्रकरणे ठेवण्यात आली होती. हि सर्व प्रकरणे या सभेत मंजूर करण्यात आली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली.

यावेळी या सभेस उपस्थित सदस्यांत सचिव तहसीलदार ओंकार ओतारी, नायब तहसीलदार सुवर्णा केळकर, गटविकास अधिकारी पुनम राणे, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, संजय गांधी निराधार समितीचे अशासकीय सदस्य प्रशांत नवार, साईप्रसाद नाईक, मनोज उगवेकर, श्रध्दा गोरे, अनंत केळुसकर, रामकृष्ण सावंत, सुनील घाग यांचा समावेश होता.

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे एकूण २४ ही प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यात श्रीमती रिया राकेश रेडकर (रेडी), हेमलता जनार्दन नाईक (वेतोरे), सुनिता वसंत साटम (तुळस), रिया रमेश पांडजी (रेडी), कु.विघ्नेश महेश साटम (तुळस), सविता महादेव भगत (शिरोडा), सुजाता सुनील पाटकर (म्हापण), दिपा दत्ताराम सावंत (वेतोरे), कुंदा भालचंद्र बागायतकर (उभादांडा), कु.साहिल उल्हास आडेलकर (रेडी), कु.सनी घसपार डिसोजा (रेडी), प्रतिक्षा प्रकाश रेडकर (रेडी), श्री.शाहू गंगाराम शेळके (तुळस), नम्रता नारायण जाधव (आसोली), स्मिता संतोष धुरी (मठ), उषा रामचंद्र पालकर (वेंगुर्ले), लक्ष्मी लक्ष्मण मोर्ये  (वायंगणी), दीप्ती दिलीप चुडजी (तुळस), संगीता पांडुरंग नाईक (मातोंड), श्री प्रथमेश विश्राम धुरी (मठ), सुप्रिया सुशांत गावडे (मठ), श्री.कुरेश नजीर शेख (वेंगुर्ला), अपर्णा शंकर नांदोस्कर  (मठ), ज्योती जगन्नाथ म्हाडगुत (आडेली) या लाभार्थ्यांचा समावेश आहे. तसेच श्रावणबाळ योजनेतील मंजूर झालेल्या ८ प्रकरणांत अलका श्रीधर राणे (रेडी), श्रीमती एवजीन मोर्तेस डिसोजा (दाभोली), श्री.आनंद नारायण परब (वेंगुर्ला), सुवासिनी दशरथ धुरी (मठ), श्री.बाळकृष्ण सहदेव आंगचेकर (तुळस), शिला शिवराम शेटकर (रेडी), भागिर्थी वासुदेव आरोसकर (भोगवे), प्रतिभा प्रभाकर पालव यांचा समावेश आहे.