
सावंतवाडी : आंबेगाव सरपंच शिवाजी ऊर्फ संजू परब यांच्या हस्ते आंबेगाव शाळा नंबर 1 मधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण व जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्याचा आपल्या अभ्यासक्रमात उपयोग करून शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी असे आवाहन परब यांनी केले. यावेळी उपसरपंच रमेश गावडे, ग्रामपंचायत सदस्या सौ साक्षी राऊळ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केळुसकर, शशिकांत परब, अंकुश जंगले, शालेय शिक्षक उपस्थित होते.