
सावंतवाडी : वारंवार होणार नुकसान बघता कोकण किनारपट्टीला ९०० कोटी रूपयांची केबल टाकण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. वारंवार वीज जाण हा प्रकार यामुळे इतिहासजमा होईल. शेतकरी,लोकांनी यासाठी सहकार्य करणं आवश्यक आहे. त्यांनी ते करावं असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं. तर सावंतवाडीत व कणकवली नगरपरिषदांसाठी अंडरग्राउंड वीज योजनेसाठी उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच लक्ष वेधणार आहे असल्याची माहिती मंत्री केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, नुकसान झालेल्या ठिकाणी ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. आचारसंहितेनंतर काही नियमात शिथिलता आणणार आहे. वारंवार होणार नुकसान बघता कोकण किनारपट्टीला ९०० कोटी रूपयांची केबल टाकण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. वारंवार वीज जाण हा प्रकार यामुळे इतिहासजमा होईल. शेतकरी,लोकांनी यासाठी सहकार्य करणं आवश्यक आहे. सगळ्यांचं होणार नुकसान लक्षात घेता सहकार्य करणं आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महावितरण खाय असून त्यांच लक्ष वेधणार आहे. पावसाचं प्रमाण कोकणात जास्त असल्याने महावितरणला अधिकच मनुष्यबळ देण्यासाठी त्यांच्याकडे मागणी करणार आहे.
पालकमंत्री असताना विशिष्ट व्हॅन खरेदीसाठी निधी दिला असताना महावितरणने तो खर्च केला नाही. महावितरणच्या कोकण विभागाला अधिकच मनुष्यबळ देण्यासाठी आपण देवेंद्र फडणवीस दिल्लीतून आल्यावर त्यांच लक्ष वेधणार आहे. तर ज्यांच्यामुळे अंडरग्राऊंड वीज वाहिनी योजना होऊ शकली नाही तेच आज त्यावर बोलत आहेत. निधी मी दिलेला होता. इतर न.प. नी योजना केली, सावंतवाडीतच होऊ शकली नाही. असा टोला त्यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना लगावला. तर कोकण किनारपट्टी भागात अंडरग्राऊंड वीज वाहिनी योजना होत आहे. सावंतवाडी व कणकवली नगरपरिषदांसाठी देखील देवेंद्र फडणवीस यांच लक्ष वेधणार आहे.