
सावंतवाडी : माडखोल-धवडकी येथील शिरशिंगे नदीपात्रात एका भल्या मोठ्या मगरीने दर्शन दिले. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून ही मगर जवळपास ८ फूट लांबीची होती, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम कोळमेकर यांनी दिली.
दरम्यान, या घटनेमुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन ग्रामपंचायत आणि वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. यामुळे नदीत कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला आणि गुरांना घेऊन जाणाऱ्या शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. मगर आकाराने खूप मोठी असल्याने स्थानिकांमध्ये भितीच वातावरण आहे. याबाबत वनविभागाने त्वरित लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.