
सिंधुदुर्गनगरी : सुमारे सुमारे ८५ लाखाच्या फसवणूक व नरबळी जादूटोणा आधीचा वापर केल्याप्रकरणी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील पोलीस चालक कर्मचारी श्रीमती तृप्ती मुळीक हिचे जिल्हा पोलीस अधीक्षकानी शुक्रवारी निलंबन केले आहे. तिला कोल्हापूर येथील न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कस्टडी दिल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी तिच्या निलंबनाची कारवाई केली आहे.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आम. उदय सामंत अशा अतिमहनीय व्यक्तींना असलेल्या डीव्ही कार ची वाहन चालक म्हणून केलेल्या कामामुळे प्रकाशझोतात आली होती. कोल्हापूर येथील या फसवणूक प्रकरणात तिचा हात असल्याचे व पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्का बसला होता.
गंगावेश कोल्हापूर येथील सुभाष हरी कुलकर्णी यांनी कोल्हापूर पोलीस ठाण्यात आपल्याला झालेल्या फसवणूक प्रकरणाबाबत 3 नोव्हेंबर 2024 रोजी प्रिया दाखल केली होती. त्यानुसार एकूण नऊ संशयीता विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सिंधुदुर्ग पोलीस अंमलदार असलेल्या तृप्ती संजय मुळीक वय ३२ र मूळ राहणार अंबट पाडली तालुका हातकणंगले व सध्या राहणार सिद्धिविनायक पार्क, दुसरा मजला ओरोस या सहा नंबरच्या संशयित आरोपी आहेत.
तृप्ती मुळे हीच्यासह दीपक पाटणकर, अण्णा उर्फ नित्यानंद नायक, श्रीमती धनश्री काळभोर, शशिकांत गोळे, कुंडलिक झगडे, ओमकार पाटणकर, भारत पाटणकर, हरीश राऊत असे एकूण नऊ आरोपी आहेत. या सर्वांवर भादवि कलम 384 386 419 420 34 सह नरबळी इतर अमानुष अघोरी प्रथा व जादूटोणा आधीचा वापर करून 84 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक झाल्याच्या फिर्यादीच्या तक्रारीनुसार या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 24 लाख 85 हजार किमतीचे सोन्याचे दागिने, दोन लाख 80 हजार किमतीचे चांदीचे दागिने व किमती वस्तू, 54 लाख 84 हजार रोख रक्कम व आरटीजीएस रक्कम, दोन लाखाचे लाकडी व किमती सामान व वीस हजार किमतीची परवाना बंदुक अशी रोख रक्कम व दागिन्यांसह किमती सामान फसवणूक करून दबाव टाकून घेतल्याचे व यात आपली या संशयित आरोपीनी फसवणूक केल्याची फिर्याद दाखल झाल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.
अटक झालेल्या व आता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातून निलंबन झालेल्या तृप्ती मुळीक हिला न्यायालयाने 14 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तीन दिवसांच्या पोलीस कस्टडीमुळे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार तिचे निलंबन करण्यात आले आहे.