
कणकवली : कणकवली तालुक्यातील ओटव व बेळणेखुर्द दोन ग्रामपंचायतीच्या. सार्वत्रिक व हळवल, वारगाव ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान यंत्रांचे सिलिंग गुरुवारी करण्यात आले. ५ नोव्हेंबरला या चार ग्रामपंचायतींसाठी आठ केंद्रांवर मतदान होणार आहे.
सरपंचपदासाठी ओटव येथे दोन तर बेळणे खुर्द येथे तीन उमेदवार रिंगणात आहेत. ओटवच्या चार जागा बिनविरोध झाल्या असून तीन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. तर बेळणेच्या पाच जागा बिनविरोध झाल्या असून दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत.
बेळणे येथे सरपंचपदासाठी विलास करांडे, लक्ष्मण चाळके व अविनाश गिरकर यांच्यात लढत आहे. प्रभाग एकमध्ये राजेंद्र चाळके व उदय चाळके यांच्यात तर प्रभाग तीनमध्ये विलास करांडे व सिद्धार्थ तांबे यांच्यात लढत होणार आहे.
ओटव सरपंचपदासाठी रुहिता तांबे व कविता तांबे यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग एकमधून दीक्षा जाधव व कविता तांबे, प्रभाग तीनमध्ये वैष्णवी गावकर व तनुष्का तांबे तर दुसऱ्यासाठी गार्गी गावकर व लता तेली यांच्यात लढत होत आहे. हळवलमध्ये एका जागेसाठी प्रभाकर राणे व सुभाष राणे यांच्यात लढत तसेच वारगाव एका जागेसाठी प्रमोद केसरकर व महेंद्र केसरकर यांच्यात लढत होणार आहे.