भोसले नॉलेज सिटी येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात

Edited by:
Published on: August 16, 2024 06:38 AM
views 181  views

सावंतवाडी : देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन भोसले नॉलेज सिटी येथे आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून त्याला राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अच्युत सावंतभोसले म्हणाले की, देश घडविण्यासाठी योगदान द्यायचं असेल तर बौद्धिक क्षमतेसोबतच शारीरिक तंदुरुस्तीकडेही लक्ष द्यायला हवं. विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता हवी. आपला देश हा युवकांचा देश आहे. अभ्यासासोबतच व्यायाम व योगा यांच्यावर लक्ष केंद्रीत करा आणि स्वतःला सक्षम व सुदृढ बनवा असं मत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सचिव संजीव देसाई, सदस्या सानिका देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, सर्व प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.