
सिंधुदुर्गनगरी | लवू म्हाडेश्वर : जनता दरबारात कुडाळ विधानसभा मतदार संघातून आज तब्बल ७५० येवढे तक्रार अर्ज दाखल झाले.या पैकी आजची जनता दरबारात एकूण ३५९ अर्जांवर सुनावणी होऊन,या पैकी २८६ येवढे अर्ज निकाली तर ७३ बाकी राहिले आहेत.उर्वरित अर्ज उद्या सकाळी अगोदर घेण्यात येणार असून,त्या नंतर सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा जनता दरबार सुरू होईल अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. जनतादरबार मध्ये दाखल करून घेण्यात आलेल्या तक्रारी मध्ये महसूल विभागाच्या सर्वाधिक 98 तक्रारी प्राप्त 82 निकाली 16 शिल्लक, भूमिअभिलेख 1 तक्रार तिहि निकाली काढली,नगरविकास 14 तक्रारी 9 निकाली 5 शिल्लक , विज महावितरण 18 तक्रारी 11 निकाली 7 शिल्लक , एसटी 10 तक्रारी 8 निकाली 2 शिल्लक, बीएसएनल 10 तक्रारी 8 निकाली 2 शिल्लक ,सार्वजनिक बांधकाम 33 तक्रारी 24 निकाली 9 शिल्लक,पाटबंधारे 1 तक्रार तीही निकाली ,राष्ट्रीय महामार्ग 14 तक्रारी 12 निकाली 2 शिल्लक,जलसंधारण 6 तक्रारी 5 निकाली 1 शिल्लक,पोलीस 1तक्रार तीही शिल्लक,राज्य उत्पादन शुल्क 1 तक्रार तीही निकाली , आरटीओ 1तक्रार तीही निकाली,ग्रामविकास 82 तक्रारी 71 निकाली 17 शिल्लक ,वनविभाग 8 तक्रारी 5 निकाली 3 शिल्लक,कृषी 7 तक्रारी 6 निकाली 1 शिल्लक , आरोग्य 10 तक्रारी 8 निकाली 2 शिल्लक,मत्स्य 2 तक्रारी दोन्ही निकाली, पत्तन 2 तक्रारी 1 निकाली 1 शिल्लक , बंदर 5 तक्रारी 4 निकाली 1 शिल्लक , अन्न व औषध प्रशासन 3 तक्रारी 2 निकाली 1 शिल्लक,समाज कल्याण 2 तक्रारी दोन्ही निकाली,कामगार आयुक्त 1 तक्रार तीही निकाली, महिला व बाल विकास विभाग 1 तक्रार तीही निकाली ,सहकारी सस्था उपनिबधक 1तक्रार तीही निकाली नगररचना 2 तक्रारी दोन्ही निकाली , एमटी डीसी 2 तक्रारी दोन्ही निकाली , जिल्हा प्रकल्प अधिकारी ( ITDP) 2 तक्रारी दोन्ही शिल्लक , रेल्वे प्रशासन 3 तक्रारी 2 निकाली 1 शिल्लक ,इतर संकीर्ण 18 तक्रारी 13 निकाली 5 शिल्लक आहेत.