७५ वर्षांची परंपरा | १ माहिना अगोदर गणपती

Edited by: भरत केसरकर
Published on: August 22, 2023 12:23 PM
views 261  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरामधील उभा बाजार येथील मसुरकर कुटुंबीयांच्या घरी तब्बल एक महिना आधी गणपतीचे आगमन होत आहे. सुमारे 75 वर्षांची परंपरा सावंतवाडी उभाबाजार येथील मुसरकर कुटुंबीय आजही जपत आहे. 19 सप्टेंबरला गणरायाचे आगमन मोठ्या थाटामातात राज्यासह कोकणात होणार आहे. मात्र, सावंतवाडी उभा बाजार येतील नरेंद्र मसुरकर  कुटुंबियांच्या घरी गणपती बाप्पाचे एक महिना आधीच आगमन झाले आहे.

या घरात श्रावण महिना सुरू झाला की विनायक चतुर्थीला गणपती बाप्पाचे आगमन होतं. या महिनाभरात कुठलाही मांसाहार घरात आणला जात नाही. आरास करून गणपती बाप्पाला ठेवला जातो. यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी त्याच एक महिन्यानंतर पूजन केले जाते. नरेंद्र मसूरकर यांचे वडील कै. भाऊ मसूरकर यांनी 1947 ला पहिल्यांदा हा गणपती गणेश चतुर्थीच्या आधी एक महिना आणून ही परंपरा घालून दिली होती. आजही ती परंपरा भाऊ मसुरकर यांचे चिरंजीव नरेंद्र मसुरकर आणि मसुरकर कुटुंबीय तब्बल 75 वर्ष म्हणजे दोन-तीन पिढ्यांची परंपरा जपत आहेत.