
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुका संजय गांधी निराधार समितीची सभा २९ नोव्हेंबर रोजी तहसीलदार कार्यालय वेंगुर्ले येथे संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे यांच्या अध्यक्षतेखालील पार पडली. या बैठकीत संजय गांधी निराधार योजनची ५१ व वृद्धापकाळ/ श्रावणबाळ या योजनेची २२ अशी एकूण ७३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. हि सर्व प्रकरणे या सभेत मंजूर करण्यात आली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली. यावेळी या सभेस वेंगुर्ला गटविकास अधिकारी, संजय गांधी निराधार समितीच सदस्य प्रशांत नवार, श्रध्दा गोरे, अनंत केळुसकर, रामकृष्ण सावंत, सुनील घाग आदी उपस्थित होते.
संजय गांधी निराधार योजनेत मधुरा राजापूरकर (दाभोली), ऋतुराज पडणेकर, पद्मजा खोबरेकर, प्रविणा उगवेकर, दीक्षा पडते, सुरेखा गावडे, (शिरोडा), वैभव भोसले, रातप्रभा परब, कालींदि यंदे, इजाबेन डिसोजा, माधुरी साळगावकर, रेखा साठे, रंजना शिरसाट, अनिल तारकर(वेंगुर्ला), अक्षता दिपजी, गुरुदास टेंबकर, शुभांगी राऊत, सुहासिनी रेडकर (आरवली), संगीता कोळेकर, उर्मिला नाईक (वायंगणी), मिताली नागोळकर, दिव्येश कांबळी (रेडी), अनुष्का नाईक (पाल), पुष्पलता कापडी, सुजाता रेडकर (वेतोरे), रघुनंदन देसाई, अपूर्वा कुंभार, प्रेमा गावडे, संतोष परब (तुळस), जयवंत वायंगणकर (परुळे), देवल्ली धुरी (आसोली), भाग्यश्री कुर्ले, जुईली तुळसकर, भारती शेटये (उभादांडा), हरिश्चंद्र मातोंडकर (मातोंड), धीरज नळेकर (देवसु), परमानंद गावडे, शकुंतला गावडे (अणसूर), राजश्री पेडणेकर (कुशेवाडा), सुमित्रा वेंगुर्लेकर, नंदा मांजरेकर (भटवाडी), सत्यभामा पालकर (पाल), करण होडावडेकर (भेंडमळा), चंद्रभागा नाईक (होडावडा), मनिषा नाईक (खानोली), साक्षी गावडे, पार्वती गावडे (पेंडुर), रंजना आंगचेकर (आडारी), भरत राऊळ, भाग्यश्री राऊळ आदी प्रकरणे मंजूर करण्यात आली.
तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ/ श्रावणबाळ योजने अंतर्गत रामदास झालबा (शिरोडा), गुलाबी भगत (तुळस), लॉरेन्स डिसोजा, रघुनाथ मांजरेकर (उभादांडा), रघुवीर खाडे (खानोली), विष्णू आंडोस्कर (पाल), आपा हळदणकर (दाभोली), एकनाथ पेडणेकर, गायत्री तळेकर , चंद्रकांत चिपकर, सद्गुरू सोन्सुरकर, लतिका कावळे, अर्जुन डोंगरे (आरवली), लक्ष्मी राणे (सोन्सुरे), गणपत परब (खवणे), लक्ष्मी आमडोसकर (परुळे), लक्ष्मी हिंदळेकर (चिपी), रमण वेंगुर्लेकर (वेंगुर्ला), रमेश परब (आसोली) विश्वनाथ ह्डकर, रेखा सामंत आदींची प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.