७२ रक्तदात्यानी केले रक्तदान..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 11, 2024 13:45 PM
views 131  views

देवगड : देवगड तालुक्यातील राजेग्रुप शिरगाव आणि सिंधुरक्तमिञ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. ७२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित साटम, शिरगाव जि.प.गटविभाग प्रमुख राजेंद्र शेट्ये, माजी जि प सदस्य सुभाष नार्वेकर, शिरगाव उपसरपंच संतोषकुमार फाटक, महेश पाटोळे, महेश पवार, अरूण कर्ले, मंगेश लोके,वैभव साळसकर, महेश गावकर, दाजी राणे, सुरेश राणे,नंदू देसाई,सिंधुरक्तमिञ प्रतिष्ठानचे जिल्हा सल्लागार उद्दव गोरे, जिल्ह् सदस्य महेश शिरोडकर, शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ शितल चव्हाण ,डाॅ. स्वप्नाली मेस्त्री , आरोग्य साहाय्यक संदेश रणसिंग, जिल्हा रक्तपेढीचे डाॅ.पल्लवी अत्राम, प्रांजली परब, मयुरी शिंदे, कांचन परब, प्रथमेश घाडी आदी उपस्थित होते.