देवगड तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ७०.१७ टक्के मतदान

Edited by:
Published on: November 05, 2023 20:23 PM
views 138  views

देवगड: देवगड तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी मतदानप्रक्रिया पार पडली असून ९ ग्रामपंचायतीसाठी एकूण ७०.१७ टक्के मतदान झाले.सर्वाधिक ८४.६५ टक्के मतदान पावणाई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झाले. मतमोजणी सोमवारी देवगड तहसिल कार्यालयामध्ये होणार आहे.

 देवगड तालुक्यातील तिर्लोट, रामेश्वर, विठ्ठलादेवी, वानिवडे, वळिवंडे, ठाकूरवाडी, शिरवली, पावणाई, फणसगाव  या नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी ५ नोव्हेंबर रोजी एकूण २६ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानामध्ये सर्वाधिक पावणाई ग्रामपंचायत ८४.६५, शिरवली ८१.८७, वानिवडे ७५.६६, तिर्लोट ७०.३१, विठ्ठलादेवी ७०.०३, फणसगाव ६९.५४, रामेश्वर ६८.६९, वळीवंडे ६७.०३ तर सर्वाधिक कमी मतदान  ठाकूरवाडी ग्रा.पं.मध्ये ३४.१० टक्के  झाले.