देवगड जामसंडेच्या पाणीपुरवठा योजना नूतनीणासाठी 7 कोटी 31 लाखाचा प्रस्ताव

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 31, 2023 19:28 PM
views 90  views

देवगड : देवगड जामसंडे शहरातील पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी वेळवाडी सडा उंच स्लो टाकीकडे जाणारा पाण्यासाठी पाईपलाईन टाकणे, दहिबाव पंपिंग स्टेशन वीज जोडणी पर्यंत 11 kv उच्च दाब विद्युत वाहिनी बसवणे, दहिबाव येथे पंपिंग मशीन चे दोन सेट व नवीन ट्रान्सफर बसवणेनदीपात्रामध्ये टॉर्च गॅलरीचे बांधकाम करणे, तसेच खाशी साठवण टाकीपर्यंतच्या गुरुत्वाहिनीचे नूतनीकरण व बळकटी करणे अशा एकूण पाच कामांसाठी ०७ कोटी ३१ लाख रुपयांचा प्रस्ताव आमदार नितेश राणे यांच्याकडे भाजपा गटनेते शरद ठुकरूल यांनी भाजपा पदाधिकारी व नगरसेवक यांच्या उपस्थितीत सादर केला. यावेळी आमदार नितेश राणे यांनी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन उपस्थित त्यांना दिले.

आमदार नितेश राणे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यालयामध्ये आपल्या अध्यक्षतेखाली दिनांक २२जुलै रोजी देवगड जामसंडे नगरपंचायतच्या अस्तित्वातील पाणी पुरवठा योजनेबाबत व दैनंदिन पाणी पुरवठयाबाबत आपल्याकडून आढावा घेण्यात आलेला होता. सदर आढावा बैठकीच्या वेळी नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. देवगड व जामसंडे नगरपंचायत अस्तित्वात झाल्यानंतर सन १ एप्रील २०१८ मध्ये नगरपंचायतीने अन्नपूर्णा उद्भववरील स्वतंत्र योजना ताब्यात घेतली. तथापि सदर योजनेचा उद्भव हा १४.०० किमी दहीबांव येथील अन्नपूर्णा नदी असून योजनेसाठी वापरण्यात आलेली पाईप लाईन ही पुर्णपणे एम.एस. असुन बहूतांश जलवाहिनी ही खाडी किनारी लगत येत असल्याने बहुतांशी पाईप वातावणातील खाऱ्या प्रभावाने गंजून पाईप लाईनला मोठया प्रमाणात छिद्र निर्माण होतात. परिणामी अनियमित पाणी पुरवठा होतो, दहिबांव पंप हाऊस येथील विद्युत पुरवठा हा वारंवार खंडीत व कमी दाबाने होत असल्याने तसेच दहिबांव पंप हाऊस येथे सद्यस्थितीत १ पंप व १ मोटर (120 HP ) सुरु असून सदरील पंप व मोटर कार्यक्षमतेपेक्षा कमी दाबाने पाणी उपसा करत आहे. परिणामी देवगड जामसंडे शहरांस ४ ते ५ दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. सदरील पाणी पुरवठयाच्या अनियमितीमुळे नगरपंचायतीला नागरीकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. सदर योजनेचे नुतनीकरण / बळकटीकरण करण्यासाठी लागणारा निधी नगरपंचायतकडे उपलब्ध नाही. तरी देवगड जामसंडे कार्याक्षेत्रातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने खालील कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात आली आहेत.

प्रस्तावित कामाचे नाव वेळवाडी सडा उंच सलोह टाकीकडे जाणारी पाण्याची पाईप लाईन टाकणे प्रस्तावित कामांमध्ये वेळवाडी सडा उंच सलोह टाकीकडे जाणारी पाण्याची पाईपलाईन टाकणे २० लाख रुपये, दहिबाव अन्नपूर्णा नदीपात्रामध्ये टॉर्च गॅलरीचे बांधकाम करणे, २६ लाख रुपये, दहिबाव येथील पंप स्टेशन पासून इडीय सडा टाकीपर्यंतच्या उद्भव वाहिनीचे व इळये सडा टाकी पासून खाक्षी साठवण टाकी पर्यंतच्या गुरुत्वावाहिनीचे नूतनीकरण व बळकटीकरण करणे ३ कोटी ६० लाख रुपये, दहिगाव पंप स्टेशन येथील पंपिंग मशीन चे दोन सेट व नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून कार्यनिवृत्त करणे १ कोटी ४५ लाख, दहीबाव पाणीपुरवठा योजनेसाठी तळेबाजार एम एस ई बी सब स्टेशन ते दहिगाव पंपिंग स्टेशन वीज जोडणी पर्यंत अकरा केवी उच्चदा विद्युत वाहिनी बसवणे १ कोटी ८० लाख , या कामांचा कामांचा समावेश असून याला अंदाजे ७ कोटी ३१ लाख खर्च अपेक्षित असल्याचा प्रस्तावामध्ये नमूद केले आहे .