झरेबांबरमध्ये ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

Edited by: संदीप देसाई
Published on: October 31, 2023 19:00 PM
views 99  views

दोडामार्ग : प्रत्येक गावागावांत धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा होत आहे हि परिवर्तनाची एक चाहुल आहे. बौद्ध धम्म हा जाती विलीन समतेवर आधारीत असून समता निर्माण करणे उद्देश होता. जाती विलीन समाज घडवणे सर्व मनुष्य एक झाले पाहिजे हा उदात्ता हेतू होता. धम्मचक्र गतिमान करायचं असेल तर बंधुभाव निर्माण करायला पाहिजे असे प्रतिपादन धम्मचारी तेजबोधी यांनी केलं. झरेबांबर येथे जय भीम युवा मंडळ झरेबांबर रमाईनगर, या मंडळाच्या रविवारी ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन केले होते त्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित होते.

झरेबांबर याठीकाणी रविवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम जय भीम युवा मंडळ झरेबांबर रमाईनगर, यांच्या विद्यमाने ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्हानु दत्ताराम जाधव, मार्गदर्शक म्हणून आदरणीय धम्मचारी तेजबोधी ( त्रिरत्न बौध्द संघ सिंधुदुर्ग), प्रमुख वक्ते- रमाकांत जाधव (आर.पी.आय. (आठवले) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव), ऍड. एस. व्ही कांबळे (सामाजिक कार्यकर्ते ), अंकुश जाधव (माजी समाज कल्याण ग्राहक, जि.प. सिंधुदुर्ग) प्रमुख अतिथी शंकर झिलु जाधव (अध्यक्ष, सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ मुंबई, शाखा दोडामार्ग),आयु. प्रकाश लक्ष्मण कांबळे (जिल्हा सचिव आर. पी. आय. (आठवले) जिल्हा शाखा सिंधुदुर्ग), अर्जुन कृ. आयनोडकर (खजिनदार सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ मुंबई, शाखा दोडामार्ग),केशव लाडु आयनोडकर (अध्यक्ष - युवा परिवर्तन संघर्ष संस्था,दोडामार्ग), रामदास कांबळे (आर.पी.आय. (आठवले) तालुका पदाधिकारी ), घुसाजी शंकर जाधव (महाराष्ट्रवादी बहुजन सामना, शाखा दोडामार्ग), कसई दोडामार्ग नगर पंचायातीच्या महिला बालकल्याण सभापती सौं. ज्योती जाधव,सामाजिक कार्यकर्ते नकुळ कांबळे, यशवंत जाधव सह आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन, तथागत गौतम बुध्द, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि चक्रवर्ती अशोक सम्राट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, त्रिसरण पंचशिल, बुध्द वंदनेने झाली.

धम्मचारी तेज बोधी पुढे म्हणाले बदल आणि विकास होत असतो तो केवळ आपणांवर अवलंबुन आहे. आपण प्रयत्न केले तर तो होत असतो.वेळोवेळी बौद्ध धम्मावर चर्चा होणे गरजेचं आहे. सतत बौद्ध धम्म वर प्रवचन ऐकणे कल्याणकारी आहे.

प्रत्येक गावागावांत धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा होत आहे हि परिवर्तनाची एक चाहुल आहे. बौद्ध धम्म हा नीतिमत्ता आणि जीवन जगण्याची कला आहे. बौद्ध धर्म नसून धम्म आहे. माणसाने माणसांसाठी उचित व्यवहार करणे म्हणजे धम्म होय.

बौद्ध धम्म हा जाती विलीन समतेवर आधारीत असून समता निर्माण करणे हा मुख्य उद्देश होता.जाती विलीन समाज घडवणे, सर्व मनुष्य एक झाले पाहिजे हा उदात्ता हेतू होता. स्वतःच मन शुद्ध करणे म्हणजे बौद्ध धम्म आहे.विपश्यना अस्तित्वाच सत्य दर्शन यासाठी प्रत्येक व्यक्तीने विपश्यना करावी असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.

यावेळी मा.रमाकांत जाधव, ऍड. एस. व्ही. कांबळे, अंकुश जाधव, शंकर झिलू जाधव, अर्जुन आयनोडकर,भिवा आयनोडकर, प्रकाश कांबळे, घुसाजी जाधब, रामदास कांबळे. सौं. ज्योती जाधव, केशव आयनोडकर, सह आदी मान्यवर व्यक्तींनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.यावेळी समाज मंदिरासाठी विना मोबदला जमीन दिली त्या सुलोचना लक्ष्मण जाधव आणि कसई दोडामार्ग नगर पंचायतीच्या महिला बालकल्याण सभापती सौं.ज्योती जाधव मंडळाच्या वतीने शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  शंकर मधुकर जाधव (सचिव- सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ मुंबई, शाखा दोडामार्ग) यांनी केले.प्रास्ताविक आणि स्वागत संदीप आनंद जाधव (सचिव- जय भीम युवा मंडळ झरेबांबर रमाईनगर) यांनी तर आभार तुषार रमेश जाधव (सदस्य- जय भीम युवा मंडळ झरेबांबर रमाईनगर) यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय भीम युवा मंडळ झरेबांबर रमाईनगर या मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम न्हानु जाधव,उपाध्यक्ष सुशील आनंद जाधव,सचिव संदीप आनंद जाधव,सहसचिव आत्माराम यशवंत जाधव खजिनदार सुभाष दत्ताराम जाधव,सल्लागार अंकुश विष्णु जाधव, सदस्य न्हानु दत्ताराम जाधव,तुषार रमेश जाधव,स्वप्निल गुरुदास जाधव, सोमा दिपक जाधव,संगिता अंकुश जाधव यांनी खूप मेहनत घेतली.