
कुडाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी कुडाळ तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या तिसऱ्या दिवशी आज तालुक्यात एकूण ६६ अर्जांची खरेदी करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी २८, तर पंचायत समितीसाठी ३८ अर्जांचा समावेश आहे.
अर्ज विक्रीच्या कालच्या तुलनेत आज इच्छुकांचा कल काहीसा कमी पाहायला मिळाला. प्रशासकीय केंद्रावर आज फारशी गर्दी दिसून आली नाही. वरिष्ठ पातळीवरून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर कदाचित ही आकडेवारी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
प्रशासनाकडून पक्षनिहाय अधिकृत आकडेवारी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने लढतीचे स्वरूप समोर येईल. येणाऱ्या दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार आपले अर्ज दाखल करण्यासाठी मोठी शक्तीप्रदर्शने करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.










