
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघासाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाने आपला तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. अनुभवी नेतृत्व आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून, आमदार निलेश राणे यांच्या हस्ते त्यांना निवडणुकीचा 'एबी' फॉर्म सुपूर्द करण्यात आला.
अनुभवाच्या जोरावर पुन्हा मैदानात
संजय पडते यांनी यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी राबवलेले विकासप्रकल्प आणि प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव लक्षात घेता, पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे.










