जिल्हा परिषदच्या मैदानात युवा नेते विक्रांत सावंत

Edited by: विनायक गांवस
Published on: January 20, 2026 18:22 PM
views 120  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद निवडणुकीत माजगाव मतदारसंघातून तरुण, तडफदार युवा नेतृत्व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.


माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला. यावेळी विक्रांत सावंत यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या तिन्ही तालुक्यांत शिक्षण, आरोग्य, कला आणि क्रीडा क्षेत्रात विक्रांत सावंत यांनी सातत्याने भरीव कार्य केले आहे. त्यांची कार्यपद्धती, जनतेशी असलेला थेट संवाद आणि विकासाची दृष्टी यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झालेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी केलेल्या पक्षप्रवेशानंतर भाजप अन् महायुतीची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहिली असून त्यांचे पारडे जड मानले जात आहे.  श्री. सावंत यांच्या उमेदवारीमुळे माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आता निवडणुकीची चुरस वाढली आहे. प्रगतशील आणि सर्वसमावेशक विकासाचा चेहरा म्हणून मतदारांचा कल त्यांच्याकडे झुकताना दिसत असून ही निवडणूक मतदारसंघाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे. माजी आरोग्य मंत्री स्व. भाईसाहेब सावंत व जि.प. माजी आरोग्य सभापती स्व. विकास सावंत यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याच काम विक्रांत सावंत करत आहे. आता स्वतःच्या होमपीचवर त्यांना लढण्याची संधी मिळाली असून माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील माजगाव, सोनुर्ली, वेत्ये, चराठे, ओटवणे, सरमळे ग्रामस्थ आपल्याला आशीर्वाद देतील असा विश्वास विक्रांत सावंत यांनी व्यक्त केला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी सरपंच आबा सावंत, माजी सरपंच उमेश गांवकर, माजी सरपंच उत्कर्षा गांवकर, संजू कानसे, ॲड. सचिन गावडे, आर.के. सावंत, बाळू निचम, प्रा. बाळासाहेब नंदिहळ्ळी, प्रतिक सावंत, अखिलेश कानसे, प्रा. केदार म्हसकर, शुभम रेडकर, अमेय पै, सचिन बिर्जे, सुरेश सावंत, विशाल‌ लाड, संजय गावडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.