ग्रा.पं.कर्मचार्‍यांचा तीन दिवसांचा बंद ; ६३ जण संपावर

Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 18, 2023 15:25 PM
views 213  views

सावंतवाडी : विविध मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी तीन दिवसाच्या संपावर गेले आहेत. आजपासून त्यांनी काम बंद आंदोलनाला सुरूवात केली. यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांना वासुदेव नाईक यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. तसेच आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात तालुक्यातील ६३ ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.