
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या प्रवर्गनिहाय सरपंच पदाचे आरक्षण सोडत दि.८ एप्रिल २०२५ रोजी निश्चित केले जाणार आहे. बॅ. नाथ पै सभागृहात सकाळी ११. वा ही सोडत करण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.यामध्ये अनु.जातीसाठी आरक्षित पद ४ व महिला २, अनु.जमातीसाठी 0, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १७ व महिला ८, खुला प्रवर्ग ४२, महिला २१ अशाप्रकारे सरपंच पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने आरक्षण निश्चित केले जाणार आहे.