वेंगुर्ला : ग्रामपंचायत वायंगणी येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सरपंच दत्ताराम उर्फ अवी अरुण दुतोंडकर व ग्रामपंचायत नूतन कार्यकारणीच्या प्रथम वर्षपूर्ती मध्ये केलेल्या तब्बल ६.२५ कोटीच्या विकास कामांचे प्रकाशन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात या विकास कामांच्या पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच दत्ताराम उर्फ अवी अरुण दुतोंडकर, उपसरपंच रविंद्र धोंड, ग्रामपंचायत सदस्य अंनत केळजी, विनू मठकर, महेश मुणनकर, दिपाली नांदोसकर, विद्या कांबळी, राखी धोंड, विद्या गोवेकर, सविता परब आदी उपस्थित होते.
यावेळी माजी सरपंच दिपक नाईक, लक्ष्मण नांदोसकर, शामसुंदर मुणनकर रसिका पंडीत, उपसरपंच आनंद घोगळे, रविंद्र पंडीत, नव्याने नियुक्त झालेले वायंगणी पोलिस पाटील स्वप्नाली मसुरकर, तळेकरवाडी पोलिस पाटील समिधा धुरी, ग्रामपंचायत अधिकारी नंदकिशोर नवार यांचा सत्कार करण्यात आला.