चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेच्या ५२ गाड्या

Edited by:
Published on: July 02, 2023 16:22 PM
views 755  views

सिंधुदुर्ग : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यां चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने आणखी 52 विशेष गाडय़ा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या 52 गणपती विशेष गाडय़ांमध्ये दिवा- चिपळूणदरम्यान 36 मेमू स्पेशल आणि मुंबई- मंगळुरूदरम्यान 16 स्पेशल गाडय़ा आहेत. काही दिवसांपूर्वीच मध्य रेल्वेने गणपती उत्सवासाठी 156 गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता गणपती विशेष गाडय़ांची संख्या 208 वर पोहोचली आहे. या गाडय़ांचे आरक्षण सोमवारपासून सुरू होणार आहे. ट्रेन क्रमांक 01155 मेमू दिवा येथून 13 ते 19 सप्टेंबर आणि 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत दररोज सायंकाळी 7.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1.25 वाजता चिपळूणला पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01156 मेमू चिपळूण येथून 14 ते 20 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत दररोज दुपारी 1 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता दिवा येथे पोहोचेल.