
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची किलबिलाट शनिवार दिनांक १५ जून पासून सुरू होत आहे. या जिल्हा परिषदेच्या १३६० प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंत ५१,५४६ विद्यार्थी दाखल झाले आहेत. या सर्वच विद्यार्थ्यांचे स्वागत व शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मिरवणूकी द्वारे होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व खाते प्रमुख अधिकाऱ्यांना तसेच तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना पहिल्याच दिवशी शाळा भेटीचे नियोजन दिले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील हा शाळा प्रवेशाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या स्वागताने आनंदोत्सवात साजरा व्हावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी केले आहे.
शनिवार दिनांक १५ जून २०२४ रोजी जिल्हयात जिल्हा परिषदेच्या १३६० शाळांमध्ये शाळाप्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येणार असून यानिमित्त प्रभात फेरी, नवागतांचे स्वागत शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी, पालक, सन्मा, निमंत्रीत व व्यक्ती, नवागत विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी एकत्रित येऊन मिरवणूक काढणे, इयत्ता पहिली व इतर वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांचे पुष्प देवुन स्वागत केले जाणार आहे. याचवेळी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण- इयत्ता 1 ली ते 8 वी च्या 51546 विद्यार्थ्यांना 58724 पाठ्यपुस्तक संचाचे वितरण शाळेच्या पहिल्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांत जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख व तालुकास्तरावरील सर्व अधिकारी सहभागी होऊन विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करुन प्रेरणा देणार आहेत, या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. मकरंद देशमुख यांनी सर्व खातेप्रमुखांना आदेशित केले आहे. शाळा प्रवेशोत्सवासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, प्रतिष्ठीत मान्यवर आणि इतर शिक्षण प्रेमी नागरीक उत्साहाने सहभागी शिक्षण अधिकारी गणपती कमळकर यांनी केले आहे.
पाठ्यपुस्तके तालुकानिहाय विवरण
जिल्ह्यातील तेराशे साठ प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा अशा पहिले ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 29,592 पाठ्यपुस्तक संच व सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 29,132 पाठ्यपुस्तक संच वितरण विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी होणार आहे. असेही प्रसिद्धी पत्रकार द्वारे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी जाहीर केले आहे.