
दोडामार्ग : लोकवर्गणीतून रुग्णवाहिका संकल्पनेसाठी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेन मंगळवारी जाहीर केल्यानुसार तब्बल 51 हजार रुपयेची लोकवर्गणी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केली.
उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी व तालुकाप्रमुख संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली ही लोकवर्गणी म्हणून शिवसेनेनं आपलं सुसज्ज रुग्णवाहिका खरेदीसाठी आपल योगदान मंगळवारी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे जमा केली. यावेळी उ.बा. ठा शिवसेनेचे मदन राणे, संतोष मोर्ये, शहरप्रमुख ओंकार कुलकर्णी, संदेश वरक, मिलिंद नाईक, श्रेयाली गवस, संदेश राणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. रेडकर यांच्याकडे ही मदत सुपूर्त करण्यात आली असून जनतेच्या हितार्थ नेहमीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एक पाऊल पुढे राहणार असल्याचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी सांगितले.
बाबुराव धुरी यांच्या वाढदिवस उत्साहात
दरम्यान, सच्चे सामाजिक कार्यकर्ते तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांचा वाढदिवस शिवसेना कार्यालयात शिवसैनिकांनी केक कापून साजरा केला. याच वाढदिवसाच्या औचित्य साधून सर्वांना सोबत घेत दोडामार्गात रुग्णवाहिकेसाठी जाहीर केलेली रक्कम संयोजकांकडे श्री. धुरी व शिवसैनिकांनी सुपूर्त केली.