सुतिकागृहाला 50 ब्लॅंकेट्स

सामाजिक बांधिलकीचा उपक्रम
Edited by: विनायक गांवस
Published on: January 08, 2025 18:52 PM
views 60  views

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून सुतिकागृह व कुटीर रुग्णालयातील रुग्णांसाठी 50 ब्लॅंकेट्स देण्यात आली. सेवाभावी हेतूनं हा उपक्रम राबविण्यात आला.थंडीचे प्रमाण वाढल्या कारणाने थंडीपासून रुग्णांचा बचाव होण्याकरिता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व राजधानी ट्रॅव्हलर्स एजन्सीचे मालक शोभन भाई यांच्या संयुक्त विद्यमनाने राणी जानकीबाई सुतिका गृह व उपजिल्हा रुग्णालयात एकूण 50 ब्लॅंकेट देण्यात आली.


राजधानी ट्रॅव्हल्स एजन्सी चे मालक शोभन भाई यांनी हे ब्लॅंकेट संस्थेचा सचिव समीरा खलील यांचे पती आमीन खलील यांच्याजवळ सुपूर्त केले होते. या कार्यक्रमाप्रसंगी राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेचे डॉ. राजेश गुप्ता,प्राचार्य डॉ.संजय दळवी, डॉक्टर नंददीप चौडणकर, सिस्टर करुणा गावडे, सुशील राऊळ तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.सागर जाधव, सिस्टर विजया उबाळे, पी पी राणे, श्रीमती पटवारी तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, उपाध्यक्ष प्रा.शैलेश नाईक कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, सचिव समीरा खलील, रवी जाधव, रूपा मुद्राळे, अशोक पेडणेकर,हेलन निबरे, शाम हळदणकर, शरदनी बागवे,  समिता सावंत आदि उपस्थित होते.  यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व राजधानी एक्सप्रेस ट्रॅव्हल्स एजन्सीचे मालक शोभन भाई यांचे उपस्थितानी आभार मानले.